रावेर- शालीक महाजन | येथील पंचायत समितीत झालेल्या सुमारे दीड कोटी रूपयांच्या बहुचर्चीत शौचालय घोटाळ्यात रात्री उशीरा लेखाधिकार्यांसह चौघांना अटक करण्यात आली होती. या तपासात अजून पुन्हा दोन जणांना पहाटे ३ वाजता राहत्या घरातून रावेर पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी आता एकुण आरोंपीची संख्या ६ झाली आहे.
शौचालय योजनेत भ्रष्ट्राचार केल्या प्रकरणी रावेर पंचायत समितीचे वरिष्ठ सहायक लेखाधिकारीसह चार जणांना रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली होती. पुन्हा पहाटे तीन वाजेच्या सुमारास अजून दोन जणांना रावेर पोलीसात राहत्या घरातून अटक केली आहे.
रावेर पंचायत समितीत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गरीब कुटुंबाच्या शौचालय योजनेत तब्बल दीड कोटीच्या वर अपहार झाला होता.या प्रकरणी रावेर पोलिसात अडीच महीन्यापूर्वी दोघां विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते दोघे अद्याप पसार असतांना रावेर पोलिसांनी शौचालय योजनेचा टेक्निकल, तांत्रिक व मॅक्रो पध्दतीने तपास सुरु होता.अखेर या भ्रष्ट्राचाराला जबाबदार असलेले आरोपींच्या अटकसत्रला सुरुवात झाली आहे.
या प्रकरणी काल रात्री उशिरा पंचायत समितीचे वरिष्ठ साहायक लेखाधिकारी लक्ष्मण दयाराम पाटील, रविंद्र रामू रायपूरे, नजीर हबीब तडवी (दोघे रा पाडळा बु) आणि बाबुराव संपत पाटील (रा विवरे बु) यांना अटक केली आहे. तर पहाटे ३ वाजता रावेर पोलीसांनी पाडळा येथून रुबाब नवाद तडवी, हमीद महेमुद तडवी यांना अटक करण्यात आली आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या एकालाही पोलिस सोडणार नाही. आरोपींची संख्या अजुन वाढण्याची शक्यता आहे, असे तपासाधिकारी शितलकुमार नाईक यांनी सांगितले.या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अनुदान लाटून अपहाराला हातभार लावणार्यांवर देखील कारवाईची शक्यता असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.