रावेर शौचालय घोटाळा : अखेर चार्जशीट दाखल

घोटाळा प्रकरणात कारवाया सुरूच राहणार- पोलीस प्रशासन

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  रावेर पंचायत समितीमध्ये तत्कालिन गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्या कार्यकाळात सुमारे दिड कोटीहून अधिक भ्रष्ट्राचार प्रकरणी रावेर पोलिस प्रशासनाच्या वतीने सुमारे दिड हजार पानांचे चार्चशीट न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत १ कोटी १० लाख वसूल करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्राभर गाजलेला रावेर पंचायत समिती मधील वयक्तीक शौचालय घोटाळा झालेला होता. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आतापर्यंत ५५ जण जामीनवर आहे.  या प्रकरणात एक कोटी दहा लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. तसेच हे सर्व पैसे स्वच्छ भारत मिशनच्या खात्यावर टाकण्यात आले आहे. तसेच या सर्व गुन्हा संदर्भात रावेर न्यायालयात सुमारे दिड हजार पानाचे चार्चशीट न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. पुढे देखिल या संदर्भात करवाया सुरु राहतील तसेच पूर्ण पैसे वसुल केले जातील, असे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांनी माध्यमांना दिली.

Protected Content