दरोड्याचा प्रयत्न फसला : पोलीसांच्या सतर्कने कट उधळला

'तेरेमे दम है तो मेरेको पकडके दिखा' असे बोलून संशयित फरार

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बंदूकीचा धाक दाखवून दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा चोपडा ग्रामीण पोलीसांनी पर्दाफाश करून दरोडा टाकण्याचा कट उधळून लावला आहे. याप्रकरणी सहा जणावर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील लासून ते सत्रासेन रोडवर असलेल्या उत्तम नगर गावापासून जवळ असलेल्या घाटात काही दरोडेखोर हातात बंदूक घेवून दबा ठेवून असल्याची गोपनिय माहिती नाशिक विभागाच्या पोलीसांना मिळाली. त्यानुसार शनिवार ४ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चोपडा ग्रामीण पोलीसांच्या मदतीने धडक कारवाई करत संशयित आरोपी रविंद्र वसंत खारगे (वय-२४), जिजाबा मल्हारी फाडके (वय-३९), चंदपाशा अजितज शेख (वय-३२), जशेश लक्ष्मा भुरूक (वय-२४) सर्व रा. रा. वडगाव बुद्रुक पुणे, सतनामसिंग महारसिंग जुनैजा रा. उमर्टी ता. वारला (मध्यप्रदेश) आणि शिलकर (पुर्ण नाव गाव माहित नाही) असे आढळून आले. त्यांच्याजवळ अग्निशस्त्र (पिस्तूल) बंदूक आढळून आले. यातील सतनामसिंग जुनौजा आणि शिकलकर हे दोन्ही पळून जाण्यात यशस्वी झाले. विशेष बाब म्हणजे यातील संशयित आरोपी याने पोलीसांना उद्देशून ‘तेरेमे दम है तो मेरेको पकडके दिखा’ असे सांगून पसार झाला. याप्रकरणी पोहेकॉ मनोज दुसाने यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग विसावे करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!