रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील शासकीय दोन धान्य गोडावूनवर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी अचानक भेट देवून पाहणी केली. त्यानंतर दोनही गोडावून सील करण्यात आली. या कारवाईमुळे रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. गोडावूनमध्ये नेमके काय आहे ? याची चर्चा आज दिवसभर सुरू होती.
मध्यप्रदेश राज्य शेजारी असल्याने रावेर परिसरातून मोठ्या प्रमाणात रेशनच्या धान्याचा काळाबाजार होत असल्याची ओरड होती. विशेष म्हणजे हे धान्य रावेर तालुक्यात बाहेरुन यावलकडून येत असल्याचे वृत्त आहे. याकडे स्थानिक महसूल विभागाचे सोइस्कर दुर्लक्ष असले तरी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी मात्र याकडे खास लक्ष दिल्याचे दिसून आले. बुधवारी जिल्हाधिकारी अमन मित्तल रावेर शहरात अचानक अचानक भेट देत बुरहानपुर-रावेर रस्त्याने असलेले एका गोडाऊनमध्ये जावून पाहणी केली. तसेच रस्त्याच्या बाजूला असलेले गोडाऊनला देखिल भेट देत सिल करण्यात आले.
या घटनेची दिवसभर रावेर परिसरात मोठी चर्चा झाल्याचे पहायला मिळाले. बाबत आपल्या काहीही माहिती नाही अशी माहिती पुरवठा अधिकारी डी के पाटील यांनी दिली तर. तहसीलदार बंडू कापसे यांनी जिल्हाधिकारी साहेबांनी फक्त गोडाऊनची तपासणी केली असल्याचे सांगितले. तर प्रांतधिकारी कैलास कडलक म्हणतात, रावेर परिसरात गोडाऊन सिल करण्यात आले आहे. असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी हे गोडावून सील केल्याची चर्चा समोर येत आहे.