पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधीकाऱ्यासह अंमलदारांचा सत्कार (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस दलातून पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार असे एकूण ३३ जण सेवानिवृत्त झाले आहेत. या सेवानिवृत्त झालेल्या सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कुटुंबासह मंगलम सभागृहात पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव रमेश चोपडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे तसेच वरिष्ठ पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार तसेच कुटुंबिय मोठया संख्येने उपस्थित होते. जळगाव जिल्हा पोलीस दलातुन पोलीस उपअधीक्षक प्रताप शिकारे, भरत काकडे, सहा. पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक नाना अहिरे, नरसिंह वाघ, राजाराम भोई, कैलास चौधरी, सुनिल जोशी, विजय पाटील, किरण पाठक, किशोर काळे, विठठल धनगर, शेख गफुर शेख कादर, अशोक कोलते, नेताजी वंजारी, पंढरीनाथ भोई, सहाय्यक फौजदार अनिल सपकाळे, बापुराव काकलीत, अब्रार खान गुलाम मोहिनुददीन, भावराव इंगळे, सुधाकर पाटील, कैलास गिते, अब्दुल अजीज अब्दुल हमीद शेख, वसंत पारधी, देविदास कोळी, भास्कर बडगुजर, रामदास चौधरी, मालतीबाई वाडीले, अभिमन पाटील, पोलीस हवालदार रविंद्र कोळी, अयुब खान मसुद खान, ताहेर खान इस्माईल खान पठाण, पोलीस शिपाई रमेश पाटील असे पोलीस अधीकारी तसेच अंमलदार सेवानिवृत झाले आहेत. या सर्वांना कुटुंबासमवेत सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब गायकवाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश मराठे, संजय पाटील, पोलीस नाईक चंद्रसिंग राजपुत, जितेंद्र चौधरी, महिला पोलीस अश्विनी निकम, जागृती काळे यांनी परिश्रम घेतले

Protected Content