रावेर, प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी कोरोनाबाबत घरोघरी जाऊन नावनोंदणी करत असतांना त्यांच्याकामांत एक व्यक्तीने आडकाठी केल्याने त्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यानुसार ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. नीलकंठ महाजन यांनी ९ कर्मचाऱ्यांची समिती गठीत केली आली आहे. ही समिती घरोघरी जाऊन आरोग्याची विचारपूस करून नावनोंदणी करत आहेत. समिती सदस्य आज शनिवार २५ एप्रिल रोजी अशीच नोंदणी करण्यासाठी गेले असता मदिना कॉलनीतील आयुबखान रफीकखान याने अरेरावीची भाषकरून त्यांचे रजिस्टर हिसकावून,त्यावर घेतलेल्या नोंदी खाडाखोड केली व सरकारी कामकाजात अडथडा निर्माण केला. आरोग्य सेवक कुशल प्रल्हाद पाटील यांनी आयुबखान रफीकखान याच्या विरोधात शासकीय कामांत अडथळा निर्माण केल्याची रावेर पोलीसांत फिर्याद दाखल केली असता फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.पुढील तपास एएसआय इस्माईल शेख करीत आहेत.