रावेर, प्रतिनिधी । दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असूनही नागरिक शासनाने सांगितलेले नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. विनाकारण घराबाहेर फिरणे, मास्कचा वापर न करणे तसेच फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करत नसल्याचे दिसून येत असून अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
मास्क न वापरणे व डिस्टनसिंगचे पालन न करणाऱ्या २९ नागरिकांकडून एकूण १५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. शहरात मास्क न लावणाऱ्या १४ व फिजिकल डिस्टन्सिंग न ठेवणाऱ्या १५ अशा एकूण २९ जणांविरुद्ध पोलिसांनी धडक दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून १५००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल भागवत धांडे, महिला होमगार्ड राणू बारेला, कमल भोई यांनी केली.