रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर परीसरात संततधार पावसामुळे शहरातील नागझिरी नदीला पूर आल्याने जुना सावदा रोड वरील वाहतूक काही काळासाठी बंद होती तर काही घरांमध्ये पाणी शिरले होते.
रावेर तालुक्यात रविवारी रात्री दहा वाजता पावसाला सुरूवात झाली. सोमवारी सायंकाळपर्यंत १८ तासापेक्षा अधिक काळ पाऊस सुरु होता. या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत असून पिकांसाठी अत्यावश्यक आहे. तालुक्यातील सुकी मध्यम प्रकल्प रविवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे भरले आहे. या धरणाच्या सांडव्यावरून १० सेंटिमीटर पाण्याचा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे.
यापूर्वीच मंगरूळ धरण भरले असून भोकर नदीला पूर आला आहे. सोमवारी झालेल्या पावसाने रावेर शहरातील नागझिरी नदीला पुराचे पाणी आल्याने शहरातील जुना सावदा रोडवरील पुलावर पाणी आले होते. त्यामुळे काही काळ वाहतूक बंद पडली होती. तर नविन सावदा रोडलगत राहणाऱ्या काही अतिक्रमितंच्या घरांमध्ये पाणी घुसले होते.