गारबर्डी धरणाच्या परिसरात नऊ पर्यटक अडकले !

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील गारबर्डी येथील सुकी नदीवरील धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे नऊ पर्यटक अडकून पडले असून त्यांच्या सुटकेसाठी एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एक अलर्ट जारी केला आहे. यात रावेर तालुक्यातील सुकी नदीवर असलेल्या गारबर्डी धरण अचानक ओव्हरफ्लो झाल्यामुळे येथे नऊ पर्यटक अडकून पडल्याची माहिती देण्यात आली आहे. सावदा येथील पाटबंधारे खात्याच्या उपअभियंत्यांनी याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला देऊन एसडीआरएफच्या पथकाला पाठविण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या पर्यटकांच्या दोन्ही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला असून पाण्याचा प्रवाह जर वाढला तर ते वाहून जाण्याची भिती आहे. या अनुषंगाने धुळे येथून एसडीआरएफचे पथक निघाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, रावेरच्या तहसीलदार, नायब तहसीलदार, सावदा येथील पोलीस पथक आदी देखील सुकी धरण परिसराकडे निघाल्याची माहिती आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

%d bloggers like this: