रावेर, प्रतिनिधी । रावेर पंचायत समितीला आज बुधवार १८ नोव्हेंबर रोजी जिल्हा परीषदचे उपमुख्य अधिकारी गणेश चौधरी यांनी भेट देऊन विविध योजनांची त्यांनी माहिती जाणून घेतली.
उपमुख्य अधिकारी गणेश चौधरी यांनी घरकुल एमआरजीएस कामांचा आढावा घेऊन पंचायत समितीच्या नविन बिल्डिंगची पाहणी केली यावेळी त्यांच्या सोबत गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल देखिल उपस्थित होत्या.
तालुक्यातील बालवाडी ग्राम पंचायतेची एनए प्लॉट संदर्भाची विभागीय फेर-चौकशी होती याकामी जिल्हा परिषदचे उप मुख्यधिकारी गणेश चौधरी रावेर तालुक्यात आले होते.त्यांनी बालवाड़ी येथील चौकशी झाल्या नंतर रावेर पंचायत समितीला भेट देऊन विविध योजनांची माहिती जाणून घेतली. घरकुल एमआरजीएससह इतर योजनांवर कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना श्री. चौधरी यांनी केल्या. यावेळी विस्तार अधिकारी श्री. सोनवणे तसेच घरकुल एमआरजीएसचे कर्मचारी उपस्थिती होते.