रावेर तालुक्यात वादळामुळे केळी पिकाला फटका; ५० लाखांचे नुकसान

रावेर प्रतिनिधी । वादळामुळे रावेर बोरखेडा शिवारात बुधवारी झालेल्या वादळामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवारातील ७० हेक्टरवरील असलेल्या ९० शेतकऱ्यांचे सुमारे ५० लाख रूपयांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त झालेल्या केळी बागाची तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी पाहणी केली.

केळी बागांच्या नुकसानीसह दोन म्हसी गंभीर जखमी झाल्यात तर गावातील घरांची पत्रे उडाली असून वीजचे खांब वाकल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे. नुकसान झालेल्या भागात आज सकाळी तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी बोरखेडाच्या केळी नुकसान असलेल्या बाधित भागाची पाहणी केली यावेळी त्यांनी तलाठी व कृषी साहाय्यक यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहे. तसेच रावेर शहरात दोन घरांचे पत्रे उडाली असून एका म्हैसवर झाड पडल्याने तर दुसऱ्या म्हैसला वादळात उडत येणाऱ्या पत्राने ती कापली गेली आहे अश्या एकूण दोन म्हैसी गंभीर जखमी झाल्या आहे.

Protected Content