दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर प्रकल्प विभाग खडबडून जागी; लावणार आरोग्य कॅम्प

रावेर प्रतिनिधी । दोन विद्यार्थांचा मृत्यू झाल्यानंतर आदिवासी भागातील सर्व आश्रमशाळा खळबळून जागे झाले आहे. या घटनेला कोण जबाबदार हा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे. तर प्रकल्प विभाग शाळेत लावणार आरोग्य कॅम्प असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.

रावेर तालुक्यातील आदिवासी भागातील पिंपरकुंड येथील रहीवासी असलेल्या व लालमाती आश्रमशाळेतील पहीलीत शिकणाऱ्या दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मृत्यूचे कारण अजून स्पष्ट झाले नसल्याने उलट-सुलट चर्चेला उधान आले आहे.

पहीलीत शिक्षण घेणाऱ्या राकेश जगन बारेला व आकाश जगन बारेला दोघांचे (वय-६) यांना त्यांच्या मोठा भाऊ याने ५ जानेवारी २०२० रोजी लालमाती आश्रम शाळेतुन घरी पिंपरकुंड (ता.रावेर) येथे घेऊन गेला. त्यानंतर ८ रोजी मयत राकेश जगन बारेला याला उलटी झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पाल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. प्राथमिक उपचार करून घरी गेल्यानंतर ११ रोजी त्याचा मृत्यू झाला. त्याचा दुसऱ्या भाऊ मयत आकाश जगन बारेला १८ रोजी याच्या पोटात दुखायला लागल्याने त्याला आश्रमशाळेतील शिक्षकांनी रावेर ग्रामीण रुग्णालयात आणले. त्याला पुढील उपचारासाठी जळगाव गोदावरी हॉपिस्टलमधून औरंगाबादला जातांना मृत्यू झाला. याबाबत रावेर तालुक्यातील आश्रमशाळांमध्ये एकच खळबळ उडाली.

यात शाळेचा दोष नाही- मुख्याध्यापक
दोघे मयत मुले लालमाती आश्रम शाळेत इयत्ता पहीलीत शिक्षण घेत होते त्यांचे नातलक आले व आम्हाला आमची मुले आमच्या घरी पिंपरकुंड येथे घेऊन जायचे आहे, असे सांगून ते घेऊन गेले त्या नंतर  दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला  तसेच त्याचा दुसरा भाऊच्या पोटात दुखायला लागल्याने त्यांना आम्ही रावेरला आणले व पुढे त्याच्या उपचारार्थ नेत असतांना मृत्यू झाला. हा सर्व प्रकार त्यांच्या घरी झाला असून आश्रमशाळेचा यात काहीही दोष नसल्याचे लालमाती आश्रम शाळेचे मुख्यध्यापक मनिष तडवी यांनी सांगितले.

आश्रमशाळेत आरोग्य कॅम्प
लालमाती आश्रमशाळेत आरोग्य कॅम्प लावण्यात येणार आहे. शाळेतील सर्व विद्यार्थांची तपासणी करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शिवराय पाटील यांनी सांगितले.

यावेळी प्रकल्प विभागाचे विनिता सोनवणे यांनी पिंपरकुंड तर रावेर पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे, पोलिस उप निरीक्षक मनोज वाघमारे यांनी लालमातीला भेट दिली.

Protected Content