रावेर तालुक्यात पुन्हा पाच रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

रावेर प्रतिनिधी । रावेर कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या तपासणी अहवालात तालुक्यातील चार रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. वास्तव्यास असलेला परिसर सील करण्याचे काम प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. या वृत्ताला तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दुजोरा दिला आहे.

रावेर कोवीड केअर सेंटरने संशयित कोरोना रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज दुपारी तपासणी अहवाल रावेर आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून तालुक्यातील चार रूग्ण पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. आढळून आलेल्यामुध्ये तालुक्यातील खानापूपर येथील दोन रूग्ण, सावदा येथील एक तर ऐनपूर येथील दोन रूग्ण याचा समावेश आहे. या वृत्ताला तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान संबंधित गावाकडे आरोग्य पथक रवाना झाले असून परिसर सील करण्याचे काम सुरू आहे.

रावेर तालुक्यातील रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कालपर्यंत ७५ रूग्णांची संख्या होती. आज त्यात ५ रूग्णांची भर पडल्याने आता रूग्णांची संख्या ८० वर पोहचली आहे. आतापर्यंत ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

Protected Content