रावेर,प्रतिनिधी | तालुक्यात रोज कोरोना पोझिटीव्ह पेशंट वाढत असल्याने आता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रांतधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी आता रोज रावेर भागात येण्याची गरज असल्याची भावना सुज्ञ नागरीकां मधून उमटत आहे.
कोरोना फैजपुर प्रांतात येऊ नये म्हणून प्रांतधिकारी दोन महिन्यां पासुन पायाला चकरी लावून फिरत आहे. त्यांच्या प्रयत्नाला यश देखिल आले. परंतु मागील आठवड्यापासुन प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले यांचे रावेर भागात येणे कमी झाल्याने सर्वत्र यंत्रणा निद्रासनमध्ये गेली आहे. रोज कोरोना पॉझेटीव्ह पेशंट वाढत आहे. त्यामुळे कोरोना विरुद्ध सैनिका सारखे लढणारे प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी पुढील आठवडाभर तरी रावेर भागात मुक्काम करावा व त्यांच्या प्रशासकीय सेवतील कुशल रनणीतीने रावेर तालुक्यात रोज पॉझेटीव्ह येणारे वातावरण निगेटीव्ह करण्याची मागणी सर्वसाधारण जनतेतुन होत आहे.