रावेर तालुक्यात अवैधरित्या गौणखनिजांची वाहतूक : तिघांवर दंडात्मक कारवाई

 

रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील विश्राम जिन्सी शिवारात अवैधरित्या मुरूम व गौणखनिजांचे उत्खनन व वाहतूक करणाऱ्या तिघांवर नायब तहसीलदार यांच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे अवैधरित्या गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

विश्राम जिन्सी येथे मुरूम व गौणखनिजांचे अवैधरित्या उत्खनन व वाहतूक शनिवार ९ मे रोजी सुरुअसल्याची माहिती नायब तहसीलदार सी. जी. पवार यांना मिळाली त्यानुसार ते पथकासह गेले असता त्यांना तीन ट्रॅक्टर अवैधरित्या वाहतूक करतांना आढळून आले. हे ट्रॅक्टर जिन्सी येथील कैलास गुरुमुख पवार, गोपाळ गुरुमुख पवार व गुरुमुख खेम पवार यांच्या मालकीचे आहेत. यात एम एच १९ एएम ४०३७ व एम एच १९ एएम २०३७ ही दोन ट्रॅक्टर आढळून आली तर एक वाहन अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. तिन्ही वाहन मालक यांना दंडात्मक नोटीस देण्यात आली असून पुढील कारवाईची प्रक्रिया करणेत येत आहे. ही कारवाई उषाराणी देवगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल नायब तहसिलदार सी. जी. पवार, मंडळ अधिकारी सचिन पाटील, तलाठी दादाराव कांबळे,यांनी कारवाई केली.

Protected Content