Home Agri Trends रावेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान; पंचनामे करण्याचे आदेश

रावेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान; पंचनामे करण्याचे आदेश


रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील आदिवासी भागाला काल झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून गहु,मका पिकांची नुकासान झाले असून या नुकसाग्रस्त पिकांची पाहणी तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.

 

याबाबत वृत्त असे की, रावेर तालुक्यातील आदिवासी भागात गुलाबवाडी व पाल येथे अवकाळी पावसामुळे गहु, मका आणि बाजरी या पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील ८० ते ९० शेतकऱ्यांचे ८० हेक्टरवरील सुमारे ९० लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान आज तहसिलदार उषाराणी देवगुणे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून पंचनामे करण्याचे काम सुरु झाले आहे. यावेळी त्यांच्या सोबत मंडळ अधिकारी सचिन पाटील, तलाठी दादाराव कांबळे आदी होते.


Protected Content

Play sound