रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून खरीप हंगामामध्ये नाफेडने खरेदी विक्री संघा मार्फत हरभरा खरेदी केला. परंतु वाहतूक भाडे तसेच हमालीमध्ये संघाचे सुमारे ३५ लाख रुपये नाफेडकडे अडकल्याने प्रचंड आर्थिक अडचणीत खरेदी विक्री संघ सापडला आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांकडून खरीप हंगामामध्ये १९ हजार क्विंटल हरबरा तर २५ हजार ९७८ क्विंटल मका नाफेडने खरेदी विक्री संघा मार्फत शेतकरऱ्यांकडून खरेदी केला शेतकरऱ्यांना मालाचे पैसे मिळाले तर नाफेडला हरभरा मक्याचा माल मिळाला. परंतु या दोघांमध्ये समन्वय म्हणून काम करणाऱ्या खरेदी विक्री संघचे वाहतूक भाडे व हमालीचे १५ लाख रुपये अडकुन पडले आहे. तसेच कमिशनचे २० लाख असे एकूण ३५ लाख रुपये नाफेडकडे अडकुन पडल्याने खरेदी विक्री संघ प्रचंड आर्थिक अडचणीत आली आहे.
पैसे अडकल्याने कर्मचाऱ्यांचे पगार रखडले
नाफेडकडे हरभरा खरेदीची रक्कम अडकल्याने संस्था प्रचंड अडचणी मध्ये आली आहे. आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार करतांना आम्हाला प्रचंड समस्याना तोंड द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांना पुरेसा रासायनीक खते आणण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन नाफेडने खरेदी विक्री संघाची रक्कम लवकर द्यावे, असे येथील व्यवस्थापक विनोद चौधरी यांनी सांगितले.