रावेर कृउबा सामिती निवडणूकीचा भाजपा-शिवसेनेचा प्रचाराला सुरूवात

रावेर-लाईव्ह  ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  रावेर कृषी उपन्न बाजार समितीच्या सार्वत्रीक निवडणुक भाजपा-शिवसेना ‘लोकमान्य शेतकरी पॅनल’प्रचार नारळ श्रीक्षेत्र ओंकारेश्वर फोडण्यात आला.

 

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष आ राजुमामा भोळे, खासदार रक्षा खडसे, भाजपा नेते नंदकिशोर महाजन, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील,. उत्तर महाराष्ट्रा अध्यक्ष सुरेश धनके, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, माजी तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, शिवसेना (शिंदे गट) छोटू पाटील, विजय गोटीवाले, अॅड सूर्यकांत देशमुख, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, शिवाजीराव पाटील आदी भाजपा शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार उपस्थित होते.

 

रावेर बाजार समितीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतील असेच उमेदवार भाजपातर्फे देण्यात आले असुन मतदारांनी बाजार समितीत घराणेशाहीला थारा देऊ नका ज्यांनी रावेर तालुक्यातील एकमेव ओंकारेश्वर साखर कारखाना विकणाऱ्‍यांच्या हाती बाजार समितीची सत्ता देऊ नका अवाहन भाजपा नेते नंदकिशोर महाजन यांनी केले आहे.

 

उमेदवारांनी करून दिला परिचय

भाजपा-शिवसेना पुरस्कृत तर्फे ‘लोकमान्य शेतकरी पॅनल’ मधुन प्रल्हाद पाटील,गोपाळ नेमाड़े,गोंडु महाजन,दिलीप पाटील,राहुल महाजन,चेतन पाटील,सजंय महाजन,कल्पना पाटील,सविता पाटील,दुर्गादास पाटील,प्रविण पाचपोहे नितिन भोगे,विजय महाजन,सिकंदर तडवी,सुनिल पाटील रितेश पाटील,लुकमान शेख,वसंत यवले यांनी परिचय करून दिला.

Protected Content