रावेर प्रतिनिधी । शहरातील पोलीस ठाण्याच्या वतीने शहरातील २४ रिक्षा चालकांचे ॲन्टीजन टेस्ट करण्यात आले असून सर्वांचे अहवाला निगेटिव्ह आले आहे.
आज शुक्रवार ९ एप्रिल रोजी शहरातील पोलीस ठाण्याच्या वतीने एम.जे. मार्केट परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पो.नि. रामदास वाकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शितलकुमार नाईक, पोउनि मनोज वाघमारे, पो.कॉ. भागवत धांडे, मंदार पाटील, मुकेश सोनवणे, सचिन गुमळकर, पो.कॉ. हर्षल पाटील, श्रीराम कंगणे यांच्याउपस्थितीत आंबेडकर चौक रिक्षा स्टॉपवर रिक्षा चालकांची बैठक घेवून कोरोना रोखण्यासाठी ब्रेक द चैन आदेशाचे पालन करणे बाबत जन जागृती केली. तसेच सर्व चालकांना अँटीजेन टेस्टचे महत्व समजावून सांगून त्यांची नगरपरिषद रावेर यांच्या मदतीने एकुण 24 रिक्षा चालकाचे अँटीजेन टेस्ट करण्यात आले आहे.सर्वांची अँटीजेन टेस्ट निगिटिव आहे.