रावेरात संत भीमा भोई जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

रावेर प्रतिनिधी । संत भीमा भाई जयंतीनिमित्त विरभगतसिंग व्यायाम शाळेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबीरात ८१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

सध्या देशात कोरोना सारख्या महामारीमुळे राज्यात रक्तसाठा कमी प्रमाणात आहे. अश्या परिस्थिती भोईराज ढोलताशा पथक यांच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. केशवस्मृती प्रतिष्ठिन संचालित माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी यांच्या सहकार्याने आज एकूण ८१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्याना मास्क, सॅनिटायसर, आर्सेनिक अल्बम ३० सीएच आणि प्रमाणात देऊन प्रोत्साहन दिले. यावेळी संतभिमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिरची सुरुवात केली.

यांची होती उपस्थिती
यावेळी प्रकाश मुजुमदार, दिलीप अग्रवाल, ॲड. राहुल मुजुमदार, ॲड. सुरज चौधरी, सुधीर अग्रवाल, यशवंत दलाल, गोपाळ भोई, संजू भोई, डॉ.रुची अग्रवाल, डॉ.चंद्रदीप पाटील, संतोष भोई, योगेश भोई, अभिजित लोणारी, भूषण भोई, गणेश भोई, प्रेम भोई, निलेश भोई, प्रमोद भोई, सागर भोई आणि सर्व व्यायाम शाळेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content