रावेरात भाजपा जिल्हाध्यक्षाकडून निमित्त सांत्वनाचे , चाचपणी कार्यकर्त्यांची

 

रावेर, प्रतिनिधी । काल माजीमंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश सोहळा सुरु असतानाच , शुक्रवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे रावेरात दाखल झाले होते . माजी मंत्री खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत आहेत . त्यामुळे तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची चाचपणी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष आ. भोळे आले होते.

पक्षाच्या कार्यालयावर त्यांनी आज दुपारी चार वाजता भेट दिली. व बोरखेडा येथील हत्याकांड झालेल्या कुटुंबाचे सांत्वन केले. त्यानंतर सर्व भाजपाच्या पदाधिकारी तसेच लोकप्रतिनी यांची रावेर कृषी उपन्न बाजार समितीमध्ये एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीपासून पत्रकारांना रोखण्यात आले होते. आमची महत्वाची बैठक असल्याचे सांगण्यात आले तर खासदार रक्षा खडसे यांची यावेळी अनुपस्थिती होती. बैठकीला झेडीपी अध्यक्ष रंजना पाटील, भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, जि. प. सदस्य नंदकीशोर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, सुनिल पाटील, विशाल पाटील आदी भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Protected Content