रावेर प्रतिनिधी । शहरातील गांधी मार्केटमधील किराणा दुकान फोडून साडे सात हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास करणारा संशयित आरोपीस अटक करण्यात आली असून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील मानकर प्लॉट परीसरात राहणारे अशोक ग्यानचंद मुलचंदानी (वय-६०) यांचे महात्मा गांधी मार्केटमध्ये सुरज किराणा नावाचे दुकान आहे. १५ सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद दुकान फोडून दुकानातील ५ हजार रूपये किंमतीचे बीडीचे बंडल, अडीच हजार रूपयांची चिल्लर असा एकुण ७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी पथक तयारी करून संशयित आरोपी महेंद्र उर्फ गोंड्या ज्ञानेश्वर कोळी (वय-२४) रा. नवीन निंबोल ता. रावेर याला पोलीसांनी अटक केली. पुढील कारवाई रावेर पोलीस कर्मचारी करीत आहे.
यांनी केली कारवाई
विभागीय पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना. महेंद्र सुरवाडे, पो.कॉ.सुरेश मेढे, पो. कॉ. तुषार मोरे, पो.कॉ. मनोज म्हस्के, पो.कॉ.भरत सोपे यांनी कारवाई केली. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ सतिष सानप करीत आहे