जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. बिपासा पात्रा, प्रा. मनीष महाले,प्रा प्रियंका गाजरे व प्रा मधुर चव्हाण यांनी लेखन केलेल्या “बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग” या पुस्तकाचे प्रकाशन रायसोनी इस्टीट्युटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेट विभागाचे डीन प्रा. डॉ. सौरभ गुप्ता व परीक्षा नियंत्रक अविनाश पांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
अनेक विद्यार्थी हे त्यांच्या अभ्यासाठी अनेक परदेशी लेखकांच्या पुस्तकावर अवलंबून असतात. मात्र स्थानिक प्रेसमधून अशा प्रकारचे पुस्तक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे ही चांगली बाब असल्याचे कौतुकोद्गार श्री. प्रितमजी रायसोनी यांनी यावेळी काढले. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात दिवसेंदिवस स्थित्यंतर आणि अनेक बदल होताना दिसतात, कालपरत्वे विद्यार्थ्यांच्याही अपेक्षा असतात की त्यांना त्यांच्या महाविद्यालयांत आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे याचाच मागोवा घेवून प्रा. बिपासा पात्रा, प्रा. मनीष महाले,प्रा प्रियंका गाजरे व प्रा मधुर चव्हाण यांनी लिहिलेले हे पुस्तक विध्यार्थ्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी लेखक प्राध्यापकांनी पुस्तकाची माहिती देतांना सांगितले कि, इलेक्ट्रिकल इंजिनिअरचे काम काय असते ?, फेज, न्यूट्रल आणि अर्थिंगचे कार्य काय असते ?, विद्युत उपकरण, विद्युत प्रवाहाचे परिणाम, विद्युत प्रवाहाचा भौतिक प्रभाव, एक्स-रे प्रभाव, हीटिंग इफेक्ट, चुंबकीय प्रभाव, रासायनिक प्रभाव व ऊर्जा लेखा परीक्षण या बेसिक इलेक्ट्रिकल नॉलेजची इत्यंभूत माहिती या पुस्तकात दिली असल्याचे त्यांनी नमूद केले.