‘राफेल’ मुळे हवाई दलाची ताकद वाढेल, पण ते गेमचेंजर ठरणार नाही : शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) भारताच्या हवाई दलात राफेल विमानं सामिल होण्याने नक्कीच हवाई दलाची ताकद वाढेल. पण ते गेमचेंजर ठरणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

 

 

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवार म्हणाले की, राफेलच्या येण्याने चीनला कदाचित कोणतीही काळजी वाटणार नाही. ते आपल्यापासून खुप म्हणजे खुपच पुढच्या टप्प्यावर आहेत. आपल्यात आणि त्यांच्यात कोणत्याही प्रकारची तुलना करता येणार नाही. जर भारताने सुरक्षेच्या दृष्टीने १० गोष्टी केल्या तर चीन १ हजार गोष्टी करेल. चीन आणि भारतात एवढी तफावात आहे. राफेलच्या येण्याने चीनला त्याची काळजी वाटेल असे मला वाटत नाही, असेही पवार म्हणाले.

Protected Content