उदय वाघ सर्वसामान्यांशी नाळ जुडलेले नेते : सर्वपक्षीय अभिवादन सभेत आठवणींना उजाळा

अमळनेर प्रतिनिधी । भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे सर्वसामन्यांशी जुळलेले नेते होते. त्यांच्या निधनाने राजकारणातील एक उमदे व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना आज त्यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत व्यक्त करण्यात आल्या.

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पहिल्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून आज अभिवादन सभेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज त्यांच्या स्मारकाचे अनावरण व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.तसेच रढावण, दोधवद येथे व्यायाम शाळेचे नामकरण , डांगर येथे प्रवेश द्वार नामकरण , शनिमंदिरावर गरिबांना शाल वाटप कार्यक्रम आयोजित केला होता.

सर्वप्रथम बाजार समितीच्या समोर स्व उदय वाघ यांच्या स्मारकाचे अनावरण आमदार अनिल पाटील , आमदार राजुमामा भोळे , माजी आमदार साहेबराव पाटील ,माजी आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील , खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश मुंदडा , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, विजय पाटील , पत्रकार संघातर्फे संजय पाटील , पंचायत समिती चे माजी सभापती श्याम अहिरे , शेतकी संघाचे  माजी चेअरमन संजय पुनाजी पाटील, मंगळ ग्रह संस्थानचे दिगंबर महाले, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे , गुलाबराव बोरसे , अनिल पाटील , वसुंधरा लांडगे , वकील संघाचे अध्यक्ष शकील काझी , शिवसेना उप जिल्हा प्रमुख डॉ राजेंद्र पिंगळे , पोलीस नाईक डॉ  शरद पाटील ,जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालिका भैरवी पलांडे  यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी चाळीसगावचा शहिद जवान यश देशमुख याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

दरम्यान, त्यांच्या अभिवादन सभेत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, उदय वाघ हे राजकारणाच्या पलिकडे  सेवा , समर्पण करणारा आणि संवाद साधणारे नेते होते. भाजपने एक चांगला नेता गमावला असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजू मामा भोळे यांनी अभिवादन सभेला संबोधीत  करताना केले 

याप्रसंगी आमदार अनिल पाटील म्हणाले की उदय वाघ चळवळीतील कार्यकर्ता होते. कार्यकर्त्यांचे जाळे विणून त्याला विराट स्वरूप करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. आमच्यात राजकीय संघर्ष कायम होता मात्र निवडणुकीत खांद्याला खांदा लावून उभे राहिले उदय वाघांचा शब्द ऐकला असता तर २००९ मध्येच आमदार झालो असतो मात्र तिसर्‍यांदा त्यांचा सल्ला घेतला आणि विधानसभेत पोहचलो असे ते म्हणाले.

माजी आमदार साहेबराव पाटील म्हणाले की उदय वाघ सर्व सामान्यांची नाळ जोडणारा नेता होते. आज नगरपालिकेची सत्ता वाघ दाम्पत्यामुळे शाबीत आहे 

अभिवादन सभेस माजी आमदार स्मिता वाघ बाजार समितीचे माजी सभापती प्रफुल पाटील , संचालक पराग पाटील , पंचायत समिती सभापती रेखाताई पाटील , खा. शि. संचालक प्रदीप अग्रवाल, विक्रांत पाटील , भाजप  तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील , शहराध्यक्ष उमेश वाल्हे, जिजाबराव पाटील, शीतल देशमुख , राकेश पाटील ,  युवा सेना उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील,दिनेश साळुंखे  तसेच तालुक्यातील विविध क्षेत्रातील व्यक्ती हजर होते सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले.

 

 

Protected Content