मुंबई (वृत्तसंस्था) रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरुन सर्जिकल स्ट्राईकची फुशारकी मारणारे आज दिवसा उजेडी राष्ट्रवादी काँग्रेसकडे भीक मागत आहेत. कालाय तसमें नमः, असे ट्वीट मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी करून शिवसेनेला डिवचले आहे.
मनसेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन, शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरुन सर्जिकल स्ट्राईकची फुशारकी मारणारे आज दिवसा उजेडी राष्ट्रवादी काँग्रेसकडे भीक मागत आहेत. कालाय तसमें नमः , अशा शब्दांत देशपांडे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेने ऑक्टोबर २०१७ मध्ये मुंबई महापालिकेतील मनसेचे ७ पैकी ६ नगरसेवक फोडले होते. मुंबई महापालिकेत शिवसेनेने आपली सत्ता स्थिर राखण्यासाठी ही खेळली होती. त्यावेळी बेसावध मनसेवर शिवसेनेचा सर्जिकल स्ट्राईक असे खिजवण्यात आले होते. मनसे नगरसेवकांनी फुटून शिवसेनेत प्रवेश केल्याने महापालिकेत शिवसेना नगरसेवकांचे संख्याबळ वाढले होते. याचाच दाखला देत मनसेने शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे.