पवार कुटुंब ओबीसी आरक्षणाचे कर्दनकाळ : गोपीचंद पडळकर

मुंबई प्रतिनिधी | पवार कुटुंब हे ओबीसी आरक्षणाचे कर्दनकाळ असून त्यांच्यामुळेच राज्यातील ओबीसी आरक्षण रद्द झाले असल्याचा आरोप करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय काल सुप्रीम कोर्टाने दिल्याने आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या अनुषंगाने भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका वाहिनीशी बोलतांना पवार कुटुंबावार जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की,  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोगाला निधी दिला नाही. त्यांच्या मनात ओबीसींबद्दल आकस आहे. त्यांच्यामुळेच पदोन्नतीतील आरक्षण रद्द झालं. पवार कुटुंबच ओबीसी आरक्षणाचे कर्दनकाळ आहेत, असा हल्ला पडळकर यांनी चढवला.

पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारलाही धारेवर धरले. ठाकरे सरकारनं ओबीच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. सुप्रीम कोर्टाच्या सूचना राज्य सरकारनं पाळल्या नाहीत. राज्य सरकारने इम्पिरिकल डाटा गोळा केला नाही. १८ महिन्यानंतर आयोगाची स्थापना केली. आज निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. ओबीसींनी काय करायचं? कुठे जायचं? असा सवाल पडळकर यांनी केला आहे.

 

Protected Content