राज्यात ३ हजार २१४ नव्या रूग्णांची नोंद; दिवसभरात १९२५ रूग्ण कोरानामुक्त

मुंबई वृत्तसंस्था । राज्यात मंगळवारी दिवसभरात ३ हजार २१४ नव्या रुगणांची नोंद झाली. कोरोनामुळे दिवसभरात सर्वाधिक २४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ७५ मृत्यू हे मागील ४८ तासांमधील आहेत. तर, १७३ जणांची नोंद गेल्या काही दिवसांमधील आहे. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या 6 हजार 531 वर पोहोचली आहे. तर सध्या राज्यात १ लाख ३९ हजार १० कोरोनाचे रुग्ण आहेत

दिवसभरात 1,925 रुग्णांची कोरोनावर मात
राज्यात काल दिवसभरात 1 हजार 925 रुग्णांची कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 69 हजार 631 कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 50.09 टक्के आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 4.69 टक्के इतका आहे.

6 लाख 05 हजार 141 लोक होम क्वारंटाईन
राज्यात कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या 8 लाख 02 हजार 775 नमुन्यांपैकी 1 लाख 39 हजार 10 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 6 लाख 05 हजार 141 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर सध्या 26 हजार 572 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे 62 हजार 833 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Protected Content