राज्यात शक्ती कायदा मंजूर – राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने स्वागत(व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | राष्ट्रवादी महिलाजळगाव महानगर अध्यक्षा मंगला पाटील यांच्या नेतृत्वात आज टॉवर चौकात शक्ती कायदा बहुमताने मंजूर झाल्याचा आनंदोत्सव पेढे वाटून साजरा करण्यात आला.

 

राज्यातील महिलांना संरक्षण देणारा बहुप्रतिक्षित शक्ती कायद्याला विधिमंडळाने एकमताने मंजुरी दिली . शक्ती कायदाचे स्वागत राष्ट्रवादी पक्षाच्या महिलांनी जल्लोषात ढोल-ताशांच्या गजरात व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आले. बलात्काराच्या गुन्ह्यासाठी, फाशीची शिक्षा आणि ऍसिड हल्ला करणाऱ्या करणाऱ्याला १५  वर्षाच्या कारावासाची तरतूद या कायद्यांतर्गत करण्यात आली आहे. कायद्याची ठळक वैशिष्ट्ये अशी आहेत शिक्षेच्या कक्षात पुरुषांबरोबर महिला तसेच तृतीयपंथीयांचा इ यात समावेश केला आहे. त्यामुळे वैयक्तिक वैमनस्यातून एखाद्या पुरुषाला त्रास देण्यासाठी खोट्या तक्रारी देण्याच्या प्रकारांना पायबंद बसेल अशी तरतूद या कायद्यात करण्यात आली समाज माध्यमातून महिला विषयी अश्लील शेरेबाजी करणे टोमणे मारणे यासारख्या प्रकाराला विनयभंग मानले जाते. महिलांच्या सुरक्षिततेबाबत ऐतिहासिक असे शक्ती विधायक मंजूर करून समस्त महिलांना सुरक्षा कवच या कायद्याने मिळाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधायक मांडल्याबद्दल तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार. यावेळी राष्ट्रवादी महिला महानगर अध्यक्ष मंगला पाटील, महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , मीनाक्षी चव्हाण,सुमन बनसोडे ,युवती अध्यक्ष कल्पिता पाटील, दिव्या भोसले निवेदिता ताठे, अॅॅड.सचिन पाटील, डॉ.रिझवान शेख, रहीम तडवी, तन्वीर शेख, विकास पवार, नेहा जैन, रुपाली भामरे, सीमा रॉय, सुचिता नेवे, आशा येवले, पूजा पाटील, धारा ठक्कर, सुषमा चौधरी, वर्षा राजपूत ,शीला पाटील, प्रेरणा सूर्यवंशी, कलाबाई शिरसाठ, संगीता तायडे, भाग्यश्री लांडगे ,राहुल टोके,अनिरुद्ध जाधव आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/708707763441583

 

Protected Content