नांदेड वृत्तसंस्था । दिल्ली येथे निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित झाल्यानंतर नांदेड आणि नगर जिल्ह्यातील मशिदीत लपलेल्या ४५ तबलिगींवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सर्वांना ताब्यात घेतले असून त्यांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.
सर्व तबलिगी हे १५ मार्च रोजी नांदेडला पोहोचले आणि शहरातील एका मशिदीमध्ये थांबले होते. त्यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केलेली नव्हती. नांदेडमधील रहिवासी असून दोन्ही इंडोनेशियन नागरीकांसोबत दिल्लीच्या कार्यक्रमात उपस्थित होते. नांदेड पोलिसांनी रविवारी १० इंडोनेशियन नागरिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे दहाही जण तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यातील दोनजण नांदेडमधील रहिवासी असून हे दोघेही या इंडोनेशियन नागरिकांसोबत दिल्लीच्या या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते.
तर अहमदनगर पोलिसांनी एकूण ३५ जणांविरोधात गुन्हे दाखल केले असून हे सर्व तबलिगी जमातचे कार्यकर्ते आहेत. हे ३५ लोक दिल्लीतील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. त्यात २९ परेदशी नागरिकांचा समावेश आहे. या परदेशी नागिरकांनी दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात भाग घेऊन व्हिसा नियमांचं उल्लंघन केले असून हे सुद्धा नगरच्या स्थानिक मशिदीत थांबले होते. या लोकांनी त्यांच्या दिल्लीवारीबद्दल स्थानिक पोलिसांना माहिती दिली नव्हती, असे अतिरीक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी सांगितले. ४ परदेशी नागरिक आणि १४ स्थानिक लोक त्यांच्या संपर्कात आले असून त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्याचं सूत्रांनी सांगितले.