मुंबई-लाईव्ह ट्रेंडस वृत्तसेवा । गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पावसाचा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्याशेतातील उभे पिक जमीनदोस्त झाले आहे. दरम्यान, येत्या चार दिवसात राज्यात अवकाळी मुसळधार पाऊस व गारपीठचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. याचा राज्यातील मुख्य शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बीची पिके धोक्यात आली आहेत. गहू, हरभरा यासह द्राक्ष आणि केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
दुसरीकडे, हिंगोली, जालना तसेच पुणे जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावले आहे. मुंबईमध्येही विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तसेच ठाणे जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. उकाड्याने हैराण झालेले नागरिक सुखावले आहेत.