मुंबई वृत्तसंस्था । राज्यात आज कोरोनाचे २ हजार ३६२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७० हजार १३ वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात ७६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसभरात ७७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३० हजार १०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ४१ हजारावर
राज्यात आज ७६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या २ हजार ३६२ इतकी झाली आहे. मुंबईत दिवसभरात १ हजार ४१३ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ४१ हजार ९९ वर पोहोचली आहे. आज मुंबईत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १ हजार ३१९ वर पोहोचली आहे.
राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११.७ दिवस होता, तो आता १७.५ दिवस झाला आहे. तर देशाचा रुग्ण दुपटीचा वेग झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ४३ टक्क्यांवर गेले आहे. राज्यातील मृत्यूदर हा ३.३७ टक्क्यांवर आला आहे. ही एक दिलासादायक बाब आहे. सध्या राज्यात ५ लाख ५७ हजार ५५२ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३६ हजार १८९ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत .