राज्यात आज ‘डेल्टा प्लस’चे १० नवीन रूग्ण वाढले

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात आता डेल्टा प्लसच्या रूग्ण संख्येत वाढ होत आहे. आज दिवसभरात डेल्टा प्लसचे दहा नवीन रूग्ण आढळून आले आहे.आता राज्यभरातील रूग्ण संख्या ७६ झाली आहे.

 

राज्यात आज आढळळेल्या डेल्टा प्लसच्या रूग्णांमध्ये कोल्हापूर – ६, रत्नागिरी – ३, सिंधुदुर्ग – १ या रूग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या ७६ रूग्णांपैकी पाच रूग्णांचा मृत्यू झालेला आहे

 

‘डेल्टा प्लस’ बाधितांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून यात रत्नागिरीतील दोन, तर मुंबई, बीड आणि रायगड येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  डेल्टा प्लसने मृत्यू झालेले पाचही रुग्ण ६५ वर्षांवरील होते आणि त्यांना अतिजोखमीचे आजार होते. या पाच जणांपैकी दोन जणांनी कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या होत्या, तर दोघांनी कोणतीही लस घेतेलेली नव्हती. मृत्यू झालेल्या एका रुग्णाच्या लसीकरणाबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही, असे आरोग्य विभागाने सांगितले.

 

Protected Content