डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय , रुग्णालयात ध्वजारोहण

 

जळगाव : प्रतिनिधी ।  स्वातंत्र्यदिनी गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,  गोदावरी इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूलमध्ये  ध्वजारोहण करण्यात आले

 

गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  डॉ.उल्हास पाटील यांनी उपस्थीतांना शुभेच्छा दिल्या. डॉ.वैभव पाटील यांनीदेखील मनोगत व्यक्‍त केले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील यांच्यासह डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्टाफ उपस्थीत होता. कोरोना नियमांचे पालन करुन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

गोदावरी इंग्लिश स्कूलमध्ये कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, गोदावरी पाटील, गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या निलिमा चौधरी, गोदावरी इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ.विजय पाटील उपस्थीत होते. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्‍तीपर गीत, स्वरचित कविता,  स्वातंत्र्य सेनानींची वेशभूषा साकारली. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन  सहभाग नोंदविला.

शिक्षकांनीही देशभक्‍तीपर गीते सादर केली. डॉ.विजय पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात. सूत्रसंचालन रुपाली सोनार यांनी केले तर आभार कविता पाटील यांनी मानले.

 

Protected Content