नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेच्या मालकीसह राज्यातील सत्ता संघर्षावर मंगळवारी सुनावणी होणार असल्याचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
शिवसेनेवर नेमकी कुणाची मालकी यावरून एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्या गटांनी एकमेकांच्या विरूध्द सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. यात राज्यातील सत्तांतराच्या अनेक घटनांबाबत दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत. या सर्व याचिकांवर पाच न्यायमूर्तींच्या घटनापिठाकडे काल सुनावणी झाली होती. यानंतर यावर आज निर्णय जाहीर करण्यात आला. यात या प्रकरणी मंगळवारी सुनावणी करण्यात येणार आहे.
ठाकरे गटाला या याचिकांची एकत्रीत सुनावणी ही मोठ्या घटनापिठाकडे वर्ग करण्यात यावी अशी अपेक्षा होती. तर या प्रकरणी आज काहीही भाष्य करण्यात आले नसून पाच न्यायाधिशांच्या घटनापिठाच्या समोरच मंगळवारी सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.