चांगले टगे पोलींग एजंट नेमा…म्हणजे बोगस मतदान टाळता येईल- पाटील

 

 

पुणे : वृत्तसंस्था । पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी चांगले टगे पोलींग एजंट निवडा म्हणजे बोगस वोटींग टाळता येईल असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथील मेळाव्यात दिला आहे.

पुण्यात भाजपने संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रमुख पदाधिकार्‍यांचा मेळावा आयोजित केला होता. यामध्ये बोगस मतदानाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. मतदानाचा टक्का वाढवणं आणि बोगस मतदान रोखणं महत्त्वाचं असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. याप्रसंगी चंद्रकांत पाटील म्हणले की, बोगस मतदार रोखण्यासाठी आतापासूनच वेळ प्रसंगी संघर्ष करावा लागणार आहे. तेव्हा प्रत्येक बुथवर चांगले टगे पोलिंग एजंट नेमा. बोगस मतदान रोखण्यासाठी सुरूवातीलाच दोघा-चौघांना बाहेर काढल्यास बोगस मतदारांमध्ये भीती बसेल, असा सल्ला पाटील यांनी दिला.

या मेळाव्यात बापट यांनी चौफेर टोलेबाजी केली. त्यानंतर भाषणासाठी उभे राहिलेले चंद्रकांत पाटील यांनी बापट यांच्या कार्यशैलीवर कोटी केली. ते म्हणाले, विरोधी पक्षाला कालपर्यंत उमेदवार सापडत नव्हता. त्यांच्यात एकाला उमेदवारी मिळाली तर बाकीचे नाराज होतात. त्याचा फायदा कसा उचलयाचा हे बापटांना चांगला माहित आहे. नाराजांना जवळ घ्यायचे आणि त्यांना फूटाणे खाऊ घालून काम करून घ्यायाचे. असे सांगताच आपल्याकडे मात्र असे चालत नाही, असे सांगितले तेव्हा एकच हशा उसळला

 

Protected Content