राज्यातील संगणक परिचालकांच्या प्रलंबीत मागण्यासाठी आजपासून काम बंद आंदोलन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील संगणक परिचालकांनी प्रलंबित विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.  यासंदर्भातील माहीती निवेदन तालुक्यातील संगणक परिचालकांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

 

आपले सरकार सेवा केन्द्र प्रकल्पातील सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायतच्या सुधारीत आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा देऊन यंदाच्या अर्थसंकल्पातुन किमान  वेतनासाठी निधीची तरदुत करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात १ मार्च २०२३ पासुन महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने आजपासून यावल तालुक्यातील संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.  याबाबतचे निवेदन यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी महाराष्ट्र संगणक परिचालक संघटनेचे यावल तालुकाध्यक्ष संजय अरुण तायडे, तालुका सचिव सुधाकर कोळी, तालुका उपाध्यक्ष हर्षल सोनवणे, विलेश बावस्कर, सागर मोरे, रौनक तडवी, जावेद तडवी आदी उपस्थित होते.

Protected Content