Home क्राईम ईलेक्ट्रीक मोटारीची वायर काटरने तोडून तिघांना रंगेहात पकडले

ईलेक्ट्रीक मोटारीची वायर काटरने तोडून तिघांना रंगेहात पकडले


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शहापूर शिवारातील ईलेक्ट्रीक मोटारीची वायर काटरने तोडून चोरून नेण्याच्या प्रयत्नात आलेल्या तीन जणांना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी रविवारी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सुभाष धना पाटील (वय-५५) रा. शहापूर ता.जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. जामनेर तालुक्यातील शहापूर शिवारात धरण आहे. या धरणाच्या पात्रात त्यांनी ईलेक्ट्रीक मोटार ठेवली आहे. शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास कटरच्या सहाय्याने ईलक्ट्रीक केबलवायर चोरून नेत असतांना दिसून आले. त्यांचा पाठलाग करून पकडले. त्यांची चौकशी केली असता जितेंद्र प्रताप भील (वय-२८), सोमनाथ प्रताप भील (वय-३०), प्रताप तुकाराम भिल (वय-५५), मंगलाबाई प्रताप भिल (वय-४०) आणि हिराबाई रेशम भिल (वय-३५) सर्व रा. गोविंद महाराज झोपडपट्टी, जामनेर यांची नावे समोर आली. यातील जितेंद्र भील, सोमनाथ भील आणि प्रताप भिल या तिघांना पकडून जामनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी रविवारी २६ फेब्रुवारी रोजी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रामदास कुंभार करीत आहे

 


Protected Content

Play sound