राज्यातील उद्योग रूळावर; १३ लाख ८६ हजार कामगार कामावर रुजू – उद्योगमंत्री देसाई

मुंबई वृत्तसंस्था । कोरानामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी उद्योग विभाग सज्ज झाले आहे, ‘मिशन बिगेन अगेन’च्या मिशनमध्ये उद्योग विभागही सज्ज झालं आहे. एप्रिल महिन्यापासून ५५ हाजर २४५ उद्योगांनी उत्पादनास सुरूवात केली आहे. तर १३ लाख ८६ हजार कामगार पुन्हा कामावर रुजू झाले आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

मुंबई आणि जवळपासच्या महापालिका, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, मालेगाव इथे अत्यावश्यक सेवेतील उद्योगांना सरकारने परवानगी दिली आहे. निर्यात करणार्‍या उद्योगांनाही परवानगी दिली आहे. शेती आधारित उद्योगांनाही परवानगी दिली आहे. संरक्षण दलाला लागणार्‍या उत्पादनांच्या उद्योगांना परवानगी दिली, असेही सुभाष देसाई म्हणाले.

तसेच, उद्योग चक्र वेगाने फिरु लागले आहेत. उद्योग विभाग आणि एमआयडीसी उद्योगवाढीसाठी प्रयत्नशील आहे. देशातील विदेशी गुंतवणुकींपैकी ३३ टक्के गुंतवणूक राज्यात येते. या गुंतवणुकदारांसाठी आणखी चांगले वातावरण तयार करण्याचं काम सुरु आहे. रायगडमध्ये दिघी येथे १५ हजार एकरावर नवी एमआयडीसी उभी राहत आहे. माणगाव एमआयडीसी असे या एमआयडीसीचे नाव असेल. कारण ती माणगाव तालुक्यात आहे. देशी आणि विदेशी १० गुंतवणूकदारांशी आमची बोलणी सुरु आहे, त्यांना इथे उद्योग सुरु करण्यासाठी जागा दिली जाईल, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली.

Protected Content