जळगाव प्रतिनिधी । आज सादर करण्यात आलेला राज्याचा अर्थसंकल्प हा निराशाजनक आणि अपेक्षाभंग करणारा असल्याची टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, आमच्या सरकारच्या काळात शेतकर्यांसाठी भरीव तरतूद करून त्याची अंमलबजावणी केली होती आज केलेल्या घोषणासाठी लागनारा पैसा आणायचा कुठून आणि खर्च कसा करायचा आता याची जबाबदारी सरकारची आहे. सरकाराने अर्थसंकल्पातून फक्त घोषणांचा पाऊस पाडला असल्याचे त्यांनी सांगितले. अंमलबजावणीची स्पष्टता यंदाच्या अर्थसंकल्पात दिसत नसल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.तसेच उत्तर महाराष्ट्राला डावलून पश्चिम महाराष्ट्रासाठी भरीव तरतूददेखील या सरकारने केली असून उत्तर महाराष्ट्रातील जनतेवर हा अन्याय असल्याचेही आ. महाजन यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. नार – पार – गिरणा नदीजोड प्रकल्प बाबत निधीची ठोस तरतूद अर्थसंकल्पात दिसून न आल्याची नाराजीही आ. महाजन यांनी व्यक्त केली.