चोपडा, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्यातील इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी संविधान दिन तसेच महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जिवन चारित्र्यावर सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणाऱ्या सामान्यज्ञान परीक्षेत एकूण ५० प्रश्न असून प्रत्येक योग्य उत्तराला २ गुण आहेत व परीक्षेला १ तासाची वेळ असून गुगल फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. यापरीक्षेची लिंक दि २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. परीक्षेसाठी प्रथम पारितोषिक रोख रु ५००१/- , द्वितीय पारितोषिक रोख रु ३००१/- तृतीय पारितोषिक रोख रु.२००१/- देण्यात येणार आहे.
या परीक्षेचा शुभारंभ कोरोना पार्श्वभूमीवर छोटेखानी कार्यक्रम घेऊन करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लासुर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य नागेश बिडकर हे होते. लासुर येथील माजी सरपंच देविलाल बाविस्कर यांच्या शुभ हस्ते सदर लिंक सोशल मीडियावर व्हायरल करून शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेश अध्यक्ष जितेंद्र महाजन, संत सावता महाराज पतसंस्था लासुरचे संचालक हिंमत माळी, नाटेश्वर पीक संरक्षण सो. साचे माजी व्हा. चेअरमन किशोर माळी, ग्राहक फौंडेशन जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख अँड.कुंदन साळुंखे, श्री संत सावता माळी युवक संघाचे खान्देश विभागीय उपाध्यक्ष लक्ष्मण माळी, विभागीय संपर्क प्रमुख समाधान माळी, जळगाव जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाध्यक्ष महेंद्र माळी, चोपडा शहर अध्यक्ष रोहित माळी, शहर कार्याध्यक्ष नरेंद्र महाजन, ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक महाजन, वासुदेव महाजन, सुरेश महाजन, सरस्वती क्लासेस लासुरचे संचालक विनोद महाजन ,सामाजिक कार्यकर्ते बाळू महाजन, एवन क्लासेसचे सह संचालक यश महाजन, कुंदन माळी, तेजस माळी, ज्ञानेश माळी गौरव माळी, मयूर माळी, आदी उपस्थित होते. तरी सदर स्पर्धेत जास्तीत जास्त इयत्ता ८ ते १० वीच्या विद्यार्थीनी सहभाग घ्यावा असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेश अध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी केले आहे. सूत्रसंचालन एवन क्लासेसचे सह संचालक यश महाजन व आभार सरस्वती क्लासेस लासुरचे संचालक विनोद महाजन यांनी मानले.