Home राजकीय राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादीच्या वाटेला ; फौजिया खान अर्ज दाखल करणार

राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादीच्या वाटेला ; फौजिया खान अर्ज दाखल करणार


मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोघही पक्ष आग्रही होते. अखेर ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. राष्ट्रवादीकडून फौजिया खान राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली असून त्या आज अर्ज भरणार आहेत.

राज्यसभेवर महाराष्ट्रातून सात खासदार जाणार आहेत. यातले चार हे महाविकासआघाडीकडून तर तीन जण भाजपकडून राज्यसभेवर जातील. भाजपने उदयनराजे भोसले, रामदास आठवले आणि भागवत कराड यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकासआघाडीने राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी आणि काँग्रेसच्या राजीव सातव यांना उमेदवारी दिली असून त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केले आहेत.


Protected Content

Play sound