Home धर्म-समाज दिव्यांगांना विविध योजनांना लाभ मिळावा यासाठी निवेदन

दिव्यांगांना विविध योजनांना लाभ मिळावा यासाठी निवेदन

0
33

पारोळा प्रतिनिधी । येथील नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना प्रहार संघटने कडून दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून निवेदन देण्यात आले.

पारोळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मुंडे यांना प्रहार संघटनेचे पदाधिकारी यांनी निवेदन देण्यात आले. यात शासन निर्णयानुसार विविध योजनेचा लाभ दिव्यांगांना तत्काळ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. त्यात ५ % निधी, घरपट्टी व पाणीपट्टी सुट मिळावी; अंत्योदय योजनेचा लाभ ३५ किलो अन्न धान्य २ रू प्रति किलो प्रमाणे व विनाअट घरकुल योजनेचा लाभ तात्काळ मिळावा या मागण्यांचा समावेश आहे.

निवेदन देतांना संघटनेचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील उपाध्यक्ष – पदमसिंग गिरासे , सचिव- ज्ञानेश्‍वर पाटील , सह सचिव- हेमंत महाजन, सल्लागार-दिलीप कोळी,तालुका रुग्णसेवक- महेश मोरे, सदस्य प्रकाश पाटील ,मझहर शेख, प्रमोद पाटील अल्त्ताफ शेख ,दीपक धनगर ,ज्ञानेश्‍वर बेलेकर ,सचिन पाटील ,व इतर दिव्यांग बांधव उपस्थित होते. पारोळा शहरातील दिव्यांग बांधवांनी नगर परिषद मध्ये जाऊन नोंदणी करावी व योग्य योजनाचा लाभ घ्यावा अशी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने आवाहन करणायत आले आहे.


Protected Content

Play sound