मुंबई वृत्तसंस्था । वाढीव वीजबिलासंदर्भात पहिले निवेदन राज्यपालांना देण्यात आले आहे. राज्यपालांशी वाढीव वीजबिलासंदर्भात चर्चा केली. राज्यपालांशी बोलल्यानंतर ते बोलले पवार साहेबांशी बोलून घ्या, मुख्यमंत्र्यांशी बोलून घ्या, पवारांना मी फोन करणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. सर्वसामान्यांना येत असलेल्या वाढीव वीजबिलाच्या विषयावर राज ठाकरेंनी राजभवन येथे जात राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
जिथे 2 हजार बिले येत होती तिथे लोकांना 10 हजार बिलं आता येत आहेत. त्यासाठी पहिलं निवेदन राज्यपालांना दिलं आहे. कुठली गोष्ट सांगितल्यावर काम चालू आहे, असं सांगितलं जातं, पण त्यावर निर्णय होत नाही. ही पाच पट, सहा पट बिलं बेरोजगारांनी कुठून भरावीत ते सांगा. लवकरात लवकर निर्णय होईल, अशी आशा असल्याचंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
विषय होता लोकांना येत असलेल्या वीजबिलाबाबत, या वीजबिलाबाबत मनसेने प्रत्येक ठिकाणी आंदोलनं केली, अदानींसह अनेक जण भेटून गेले, ते म्हणाले MERC ने आम्हाला मान्यता द्यावी. आमचं शिष्टमंडळ MERC ला भेटले. त्यांचं लेखी पत्र आमच्याकडे आहे. MERC चं म्हणणं आहे कंपन्या आहेत त्या वीजबिलासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. म्हणजे एका बाजूला MERC कडे बोट दाखवते, कंपन्या MERC कडे दाखवतात. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणं झालं, या विषय आम्ही लवकरात लवकर निर्णय करू, असं त्यांनी सांगितलं.