राजू शेट्टींनी राष्ट्रवादीचा आमदारकीचा प्रस्ताव स्वीकारला !


बारामती (वृत्तसंस्था)
राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधान परिषदेवर जाण्याचा प्रस्ताव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्वीकारला आहे. शरद पवार यांच्या खास आग्रहावरून राजू शेट्टी आज बारामतीत आल्यानंतर आपल्या निर्णयाची घोषणा केली.

 

राजू शेट्टी यांनी आज बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. गोविंद बाग या निवासस्थानी शेट्टी यांनी पवारांची भेट घेतल्यानंतर आपला निर्णय जाहीर केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. तर शेट्टी यांच्यासोबत संघटनेचे स्थानिक नेते सतीश काकडे तसेच राजेंद्र ढवाणही होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात शेट्टी व पवार यांच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर खास फोटोसेशनही झाले. या चर्चेत शेट्टी यांनी राष्ट्रवादीकडून आलेला आमदारकीचा प्रस्ताव मान्य केल्याचे स्वाभिमानी संघटनेकडून जाहीर करण्यात आले. दरम्यान, विधिमंडळात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी राजू शेट्टी यांच्यासारख्या आक्रमक व अभ्यासू नेत्याने प्रतिनिधित्व करावे, असा आग्रह संघटनेतून धरला गेला आणि त्या आग्रहातूनच शेट्टी यांनी राष्ट्रवादीचा प्रस्ताव स्वीकारल्याचे बोलले जात आहे.

Protected Content