राजर्षी शाहू महाराज स्मृतीदिनी शाहीरी, पोवाडे व व्याख्याने द्वारे रगंला लोक जागर (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या अंतर्गत व राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्ताने सांस्कृतिक कार्य संचालनालय व राष्ट्रीय सेवा योजना विभाग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या संयुक्त सहकार्याने विशेष व्याख्यान व शाहीरी पोवाड्याद्वारे आयोजन करण्यात आले होते.

 

या कार्यक्रमाचा शुभारंभ सामाजिक न्याय विभाग जळगावचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ए. आर. चौधरी उपस्थित होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी विजय रायसिगं, नेहरु युवा केन्द्रचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, प्रशिक्षण संस्थेचे कार्यालयीन अधिक्षक बाळासाहेब कुमावत, गट निदेशक ए. आर. बोरोले उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलित करून करण्यात आली.

राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी दिनानिमित्ताने मणियार लॉ कालेज येथील सहाय्यक प्राध्यापक व राज्यशास्त्राचे आभ्यासक प्रमुख वक्ते प्रा. गणपत धुमाळे यांचे विशेष व्याख्यानाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. या व्याख्यानात समता मूलक समाज निर्मितीत राजर्षी शाहू महाराज यांचे योगदान या विषयावर त्यांनी आपले प्रभावी विचार मांडले कार्यक्रमाच्या दुस-या सत्रात, शाहीर शिवाजी पाटील व सहकारी यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जिवन कार्यावर, विविध सामाजिक विचारावर शाहीरी पोवाड्याद्वारे लोकजागर हा कार्यक्रम सादर केला तर जळगावचे प्रसिद्ध पथनाटयकार लोककलावंत शाहीर विनोद ढगे आणि सहकारी यांनी शाहू महाराज यांचा सामाजिक न्यायाचा नाट्य व गिताद्वारे संदेश देण्यारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून राज्याच्या सहा प्रशासकिय विभागात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक विभागिय क्षेत्रातील कार्यक्रम हा जळगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विजय सौरभ व संचालक बिभीषण चवरे यांच्या मार्गदर्शना ने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी दिपक कोळी सर व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एस. एस. उगले यांनी केले. सूत्रसंचालन सचिन महाजन यांनी तर आभार समन्वयक विनोद ढगे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी दुर्गश आंबेकर, अरविंद पाटील, अवधुत दलाल, मोहीत पाटील, व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकाने परिश्रम घेतले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2728259693984560

 

Protected Content