राजमाता जिजाऊ महिला मंडळाचा एसटी संपास जाहीर पाठींबा

एरंडोल प्रतिनिधी |सुमारे १७ दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचारी वर्गाचा संप सुरू असून शासनाने एसटी कर्मचार्‍यांच्या रास्त मागण्या मान्य कराव्यात आणि त्यांना न्याय द्यावा अशी मागणी करीत राजमाता जिजाऊ महिला मंडळाने एरंडोलला एसटी आंदोलनास जाहीर पाठींबा दिला आहे.

 

एरंडोलला बस स्थानकाजवळ आपल्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात एसटी कर्मचारी वर्ग कुटूंबासह आंदोलनात सहभागी झाले असल्याने सहानुभूतीपूर्वक पाठींबा देत असून संप त्वरीत मिटावा अशा मागणीचे निवेदन यावेळी महिलांनी दिले. वास्तविक संप करून सामान्यांना अडचणीत आणणे शासनाने भाग पाडले आहे. अनेकवेळा आंदोलने केलीत परंतू शासनाने, महामंडळाने एसटी कर्मचार्‍यांची केवळ दिशाभूल करून फसणूकच केली असल्याने नाईलाजास्तव एसटी कर्मचारींना संपाचे हत्यार उपसावे लागले असून शासनाने आतातरी जागे व्हावे आणि कर्मचारी वर्गाच्या मागण्या मान्य कराव्यात अशी अपेक्षा यावेळी महिला मंडळ सदस्यांनी व्यक्त केली. सदरप्रसंगी राजमाता जिजाऊ महिला मंडळ अध्यक्षा तथा माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव, शकुंतला पाटील, मीना वसईकर, शोभा पाटील, अनिता चव्हाण, अन्नपूर्णा पाटील, लता प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचारींना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

Protected Content