मुंबई (वृत्तसंस्था) राजगृहावर दोन व्यक्ती आले होते, ही गोष्ट खरी आहे. या दोन व्यक्तींनी नासधूस केली आणि सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्याचा प्रयत्नही केला. राजगृहावर सर्व पोलीस आणि अधिकारी पोहोचले असून चौकशी सुरू आहे, पोलिसांनी अत्यंत चोख काम केले आहे. या प्रकरणी सर्व जनतेने शांतता राखली पाहिजे. राजगृहाच्या आजूबाजूला गर्दी करू नका’, अशी विनंती बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सर्व आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी असे आवाहन केले आहे. मी सगळ्यांना व्हिडीओद्वारे आवाहन करतो आहे की सगळ्या आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी, ही गोष्ट खरी आहे की राजगृहावर दोघेजण आले त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातले. पोलिसांनी त्यांचं कर्तव्य केले. राजगृहाच्या आजूबाजूला आंबेडकरवाद्यांनी जमू नये, पोलीस त्यांचे काम करत आहेत. आपण सगळ्यांनी शांतता राखावी, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.