यावल प्रतिनिधी | किनगाव खुर्द येथील रहिवाशी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ पदाधिकारी शुक्राम व्यंकट पाटील (वय ८२) यांचे रविवारी रात्री १ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
शुक्राम आण्णा यांनी दि.१० मार्च १९६९ ते २५ जानेवारी १९८५ पर्यंत १६ वर्षे बिनविरोध सरपंच पद भुषवले. आपल्या राजकीय प्रवासात आण्णा ग्राम पंचायत, फ्रूटसेस सोसायटी तसेच विविध कार्यकारी सोसायटीत व्हाईस चेअरमन होते. तसेच ७ डिसेंबर १९८० रोजी. ना.शरदचंन्द्र पवारांसोबत ते जळगाव ते नागपूर शेतकरी दिंडीमध्ये सहभागी झाले होते. आण्णा शरदचंन्द्र पवार यांचे निकटवर्तीय होते. ते काँग्रेस पक्षाचे कार्येकर्ते होते. मात्र नंतर ते पवार साहेबांनसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्ये करत होते. शुक्राम आण्णांनी काही सुशिक्षित तरूणांना त्याकाळी विजय नवल पाटील यांच्या संस्थेत रोजगार उपलब्ध करून दिला. माजी पंतप्रधान चंन्द्रशेखर यांच्याशीही त्यांची जवळीक होती. त्यांच्यासोबतही ते पदयात्रेत सहभागी झाले होते. आण्णांना राजकीय प्रवासात यावलचे माजी आमदार रमेश चौधरी यांचे नेहमी सहकार्य मिळत होते. माजी गृहमंत्री सोनुसिंग धनसिंग पाटील, इंग्लडचे माजी हाय कमिशनर ना.ग.गोरे, माजी विधानसभा अध्यक्ष व राज्यमंत्री बाळासाहेब मधुकरराव चौधरी, माजी बांधकाम मंत्री जगंन्नाथ रावजी जाधव, माजी महसूलमंत्री उत्तमराव पाटील, माजी गृहराज्य मंत्री जे.टी. महाजन, शेतकरी संघटनेचे शरद जोशी, के.एम.पाटील, शिखर बँकेचे माजी चेअरमन प्रल्हादराव पाटील, यशवंत मंन्साराम बोरोले, सुरेशदादा जैन, कृष्णराव चौधरी, तानाजीराव भोईटे, प्रेमचंद व्यंकट पाटील, मुंबईचे माजी कमिशनर आर.एल.परदीप. जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी एन.रामाराव व सिने अभिनेते निळू फुले यांचा सहवास शुक्राम आण्णांना भेटला. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले शुक्राम आण्णा आपल्या साधारण राहणीमान व मनमिळाऊ स्वभाव तसेच प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होणे या कारणांनमुळे पंचक्रोशीसह राज्यात त्यांनी नावलौकीक मिळवला. आज त्यांचे नातू भुषण नंदन पाटील हे किनगाव खुर्दचे बिनविरोध लोकनियुक्त सरपंच आहेत व आण्णाचे विचार पाठीशी घेऊन ते सामाजिक कार्ये करीत आहेत. आण्णांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुन, जावाई व नातवंडे असा परीवार आहे.