राऊत म्हणतात, ‘आता रडायचं नाही, लढायचं !’

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार संजय राऊत यांनी आपल्या मित्र पक्षांच्या नेत्यांना आज ईडीच्या कोठडीतून पत्र लिहले असून यात शेवटच्या श्‍वासापर्यंत लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाईचा कॉंग्रेसह अन्य पक्षाच्या नेत्यांनी विरोध केला होता. त्यांचे आभार मानण्यासाठी राऊत यांनी आज कॉंग्रेसचे राज्यसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह इतर पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. त्यापैकी खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, माझ्यावर झालेल्या कारवाईविरोधात मला कृती आणि विचारातून पाठिंबा दिला. संसदेत आणि संसदेबाहेर माझ्या सहकारी खासदारांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर आपण सर्वांनी पाठिंबा दिला, त्यासाठी आभार मानत असल्याचे राऊत यांनी म्हटले.

 

दरम्यान, या पत्रात संजय राऊत यांनी म्हटले की, मी वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार वागत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला ’रडायचं नाही लढायचं’ अशी शिकवण दिली होती. त्याच मार्गाने जात असल्याचे राऊत यांनी म्हटले. आपल्याविरोधात राजकीय सूडबुद्धीतून तपास यंत्रणांद्वारे कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तथापि,  बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माझे कुटुंबीय, हितचिंतक यांच्या पाठिंब्यावर या कठीण काळातून लवकरच बाहेर पडू असा विश्वासही संजय राऊत यांनी या पत्रात व्यक्त केला आहे.

 

Protected Content